शेतकऱ्यांच्या ऊस बिला थकवल्याप्रकरणी म्हेत्रेंविरोधात तक्रार..

साखर आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा साखर आयुक्त कार्यालायावर मोर्चा काढणार; शेतकर्‍यांनी दिला इशारा..

प्रतिनिधी( नळदुर्ग )

मातोश्री शुगर कारखान्याने ऊसाचे बिल शेतकऱ्यांचे न दिल्याने माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश देऊ नये यांच्या मुळे अनेक शेतकरी आत्महत्याच्या मार्गावरती आहेत.अक्कलकोट तालुक्यातील माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने ऊसाचे बिल तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे बिल दिले नाही. त्यामुळे आर्थिक आडचणीत शेतकरी सापडल्याने तुळजापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी म्हेत्रे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्य मार्गावरती आहेत. साखर प्रशासनाने शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलाचे दिले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याचे चित्र पाहून “कारखानदार जोमात शेतकरी कोमात” शेतकऱ्यांना कोणताही सन उत्सव साजरा करता येत नाही. शेतातील शेत कामे मशागत करता येत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्मा झाली आहे. शेतकरी वारंवार कारखान्याच्य चकरा मारुन बिलाची मागणी केली असता. तुम्हाला काय करायचे आहे ते करा आम्ही बिल देत नाही अशी धमकी शेतकऱ्यांना दिली जात आहे.

अशा अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल देण्यासाठी प्रयत्न करुन बिल मिळवून द्यावे नंतर माझी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा पक्ष प्रवेश घ्यावा हि विनंती शेतकरी आयुब शेख यांनी केलेली आहे. साखर आयुक्त यांनी मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचे बिल न दिल्याने सिध्दाराम म्हेत्रे यांच्या वरती तात्काळ कार्यवाही करावी हि विनंती. शेतकरी पूत्र आयुब शेख यांनी केली आहे. ८ दिवसाच्या आतजर शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल नाही मिळाले तर साखर आयुक्ताला ऑफीस मध्ये बसू देणार नाही. याची नोंद घ्यावी व वरील विषयाची तात्काळ उपमुख्यमंत्री व साखर आयुक्तांनी लवकरात लवकर नोंद घेऊन थकलेले शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल काढावे हि नम्र विनंती.

प्रतीनिधी अय्युब शेख

(एनटीव्ही मराठी – धाराशीव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *