जामखेड प्रतिनिधी
दि 5 जून
जामखेड येथील सहारा हॉस्पीटल च्या वतीने जुन महिन्यातील प्रत्येक शनीवारी आयोजीत करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे संचालक डॉ. सुनिल हजारे यांचे वतीने आवाहन करण्यात आले.
जामखेड येथील सर्व सेवासुविधासह कार्यरथ असणारे संचालक डॉ. सुनील हजारे व इतर तज्ञ डॉक्टरांच्या वतीने चालवण्यात येत असणारे सहारा हॉस्पीटल व आय.सि.यु. हॉस्पीटलच्या वतीने नेहमीच सेवा भावी उपक्रमा बरोबर गरजु व गोरगरीब रुग्णासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा राबवून समाज सेवी मुल्य जपत रुग्ण सेवा केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर संचालक डॉ. सुनील हजारे व त्यांच्या सर्व डॉक्टर टीमच्या माध्यमातुन लोक हिताचा निर्णय घेण्यात आला असून आता सहारा हॉस्पीटलच्या माध्यमातुन जुन 2025 या महिन्यातील प्रत्येक शनिवारी मोफत आरोगय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरातुन प्रत्येक स्वरूपाच्या आजारी रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. सुनील हजारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रातून स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने या शिबीराचा लाभ घेऊन तपासणी करावी, असे आव्हाहन करण्यात आले आहे. तरी प्रत्येकाने या शिबीराचा लाभ जरूर घ्यावा.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी