यवतमाळ:

पो.नि. एल.डी. तावरे पोस्ट:बाभुळगाव यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून दि. ०८/०६/२०२५ रोजी रात्री ११:०० वा. दरम्यान पोलीस स्टाफ व श्री. किशोर अंबरकर (बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती बाभुळगाव), श्री. प्रविण जाधव (मोहीम अधिकारी यवतमाळ), श्री सुरेश गावडे (मंडळ कृषी अधिकारी) व त्यांच्या टीमच्या मदतीने मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहन क्रमांक एम. एच. २९ सी. व्ही. २६९० या वाहनाचे चालक नामे प्रविण वासुदेवराव साखरकर (वय २९ वर्ष, रा. गवंडी ता बाभुळगाव) याला ताब्यात घेवुन मिळालेल्या माहितीप्रमाणे विचारपुस केली असता, त्याने रमेश सुखदेव लांजेवार (वय ५७ वर्ष, रा. गवंडी) व किशोर रामराव वाटमोडे (वय ४९ वर्ष, रा. गवंडी) यांच्या मदतीने प्रतिबंधीत केलेले अनधिकृत कापुस बियाने विक्री करीत असल्याचे सांगीतले. पोलीस स्टाफ व कृषी अधिकारी यांच्या टीमच्या मदतीने आरोपी नामे प्रविण वासुदेवराव साखरकर, रमेश सुखदेव लांजेवार व किशोर रामराव वाटमोडे यांच्या ताब्यातून प्रतिबंधीत केलेले अनधिकृत कापुस बियाणे पाकिट संख्या ४०० किंमत रू ५,१६,७५०/- , वाहन क्रमांक एम. एच. २९ सी. व्ही. २६९० इको मारूती सुझुकी किंमत रु. ५,००,०००/- व वाहन क्रमांक एम. एच. ०२ ए. यु. ७५९२ मारूती स्विफ्ट किंमत रु. २,००,०००/- असा एकूण १२,१६,७५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून मा. बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती बाभुळगाव यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून आरोपींविरूध्द बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण सरंक्षण अधिनियम १९८६, कापुस बियाणे अधिनियम २००९, कापुस किंमत नियंत्रण कायदा २०१५ व भारतीय न्याय सहींता कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करून गुन्हयातील आरोपींना अटक करण्यात आली.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पीयुष जगताप साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनेश वैसाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाभुळगाव पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, स.पो.नि. हेमंत चौधरी, पो.हे.कॉ. ९० विजय लोखंडे, पो.हे.कॉ. १६६२ गणेश शिंदे, ना.पो.कॉ. २२८४ निलेश भुसे, ना.पो.कॉ. ६८८ दिनेश अहिरे, पो।कॉ. २३५३ भूषण बिरे यांनी पार पाडली.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *