MUMBAI | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोघांचा फोटो शेअर करत ही घोषणा केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या मोर्च्याचे समर्थन करत मराठी अस्मितेसाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले.