
जामखेड:
श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळा, बारादरी फाटा तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, ओबीसी व इतर वंचित घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर मुख्य शाखेच्या चीफ मॅनेजर माननीय श्रीमती भूमिजा रावत मॅडम यांनी शाळेला विशेष भेट दिली.
यावेळी श्रीमती रावत मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व शाळेला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शाळेसाठी आवश्यक मदत दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संतोष गर्जे सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर यांनी शाळेतील विविध उपक्रमांची व गरजांची सविस्तर माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲड. मिलिंद फुंदे सर यांनी मान्यवरांचे आभार मानले.
शाळेच्या सहशिक्षिका गिते मॅडम यांनी श्रीमती रावत मॅडम यांचा औपचारिक सत्कार केला. या कार्यक्रमाला नागरे सर, दहिफळे सर, डोळे सर, गिते सर, जाधव सर, चौधरी सर, आंधळे सर, वाघ सर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करत शाळेने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नंदु परदेशी
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी