जामखेड (प्रतिनिधी – नंदु परदेशी )

महाराष्ट्र शासन ,जलसंपदा विभाग,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे या अंतर्गत असलेल्या धरणांच्या सुरक्षेबाबत अवलोकन करणेसाठी महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक धरण सुरक्षा पुनरावलोकन समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या सदस्य पदावर अहिल्यानगरचे जिल्ह्य़ातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी व सेवानिवृत अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग शिवाजी बोलभट यांची सदस्य म्हणून नियुक्ती करणेत आली आहे. उत्कृष्ट अधिक्षक अभियंता म्हणून बोलभट यांचा राज्यपाल यांच्याकडून यापूर्वी गौरव झालेला आहे.

श्री शिवाजी बोलभट हे जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील रहीवासी असून त्यांनी यापूर्वी भंडारदरा जलविद्युत प्रकल्प, मुळा प्रकल्प, उजनी प्रकल्प, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, चासकमान,कुकडी प्रकल्प(पाच धरणे), नीरा देवघर, गुंजवणी प्रकल्प येथे अधिक्षक अभियंता म्हणून अहिल्यानगर, सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले आहे तसेच अधीक्षक अभियंता पदावर असताना बिड,   लातूर, उस्मानाबाद जालना,परभणी,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जायकवाडी धरणासह इतर धरणावर व्यवस्थापनाचे काम केले आहे.  यापूर्वी राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यकारी अभियंता म्हणून शिवाजी बोलभट यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे शासनाला धरण क्षेत्रात एक तज्ञ सदस्य मिळाला आहे. त्यांच्या निवडीचे जामखेड पत्रकार संघ ; जामखेड व अहील्यानगर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे. 

नंदु परदेशी
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *