माध्यमिक विद्यालय बाचणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व. पै. कृष्णात लक्ष्मण कळंत्रे (दादा) यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त Nmms परीक्षा 2024-25 मधील गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार, SSC मार्च 2025 माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार, इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विदयार्थ्यांचा सत्कार, स्पर्धेच्या युगातून यशस्वी वाटचाल करणाऱ्या शासकीय सेवेत निवड झालेल्या व्यक्तिंचा सत्कार स्मृति चिन्ह देऊन करण्यात आला. तसेच वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 42 लोकांनी रक्तदान केले. मोफत डोळे तपासणी शिबीर मध्ये 80 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोफत रक्त व लघवी तपासणी शिबीरात C.BC., H.B, IC, ब्लड शुगर, हिमोग्लोबीन इ. 21 प्रकारच्या रक्त तपासण्या 149 लोकांची करण्यात आली. शालेय परिसरात वृक्षारोपण प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करून स्व. पै. कृष्णात लक्ष्मण कळंत्रे (दादा) यांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्ताद श्री. रंगराव गोविंद कळंत्रे (बापू) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. पै. कृष्णात लक्ष्मण कळंत्रे (दादा) यांच्या प्रतिमेचे
पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये श्री. किशोर शिंदे (पोलिस निरीक्षक, करवीर) यांनी आपल्या मनोगतात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे कार्य जसे निस्वार्थी होते तसे स्व. पै कृष्णात लक्ष्मण कळंत्रे ( मामा) यांचे कार्य आहे. या कार्याचा वसा पुढे दादांचे चिरंजीव पै. संग्राम कळंत्रे व त्याचे सर्व कुटुंब पुढे अविरत चालू ठेवत आहेत. असे प्रतिपादन केले. श्री. पै. संभाजी पाटील (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड कोल्हापूर) यांनी आपल्या मनोगतातून दादांचा दुरदृष्टीकोन व जीवनकार्याचा आढावा घेतला तर सौ. सुजाता अविनाश जाधव (राज्य कर निरीक्षक वस्तू व सेवा कर विभाग कोल्हापूर) यांनी आपल्या मनोगतातून संकटावर कशी मात करावी याविषयी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. बाबासाहेव देवकर (माजी सदस्य जि.प. कोल्हापूर ) यांनी आपल्या मनोगतामध्ये बाचणी गावाची सर्व क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थीनी मनोगतामध्ये कु प्रिया ईश्वर मरळकर हिने दादांच्या कार्यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. विश्वास पाटील यांनी विदयार्थ्यांना आपल्या मनोगतातून बहुमोल मार्गदर्शन केले. थोर नेत्यांची प्रेरणा अंगी असल्याशिवाय आपली प्रगती नाही. असे मनोगतातून त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. किशोर शिंदे साहेब (PI करवीर) श्री मुकुंद वाडकर (क्रीडा अधिकारी औरंगाबाद),श्री युवराज पाटील ( कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई),श्री विश्वास मगदूम (उदयोजक रत्नागिरी) सौ. सुजाता अविनाश जाधव (राज्य कर निरीक्षक वस्तू व सेवा कर विभाग कोल्हापूर) श्री. रणधीर विजयसिंह मोरे (सरपंच सर वडे ता. राधानगरी), श्री पै. संभाजी पाटील (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कोल्हापूर) होते. तर प्रमुख उपस्थिती सौ. वासंती नामदेव कारंडे (सरपंच मौजे ग्रामपंचायत चाचणी), श्रीमती शोभाताई कृष्णात कळंत्रे, श्री. बाजीराव कळंत्रे, श्री. बाबा साहेब देवकर, श्री चंद्रकांत पाटील, श्री कृष्णात चौगले दादांचे चिरंजीव श्री.संग्राम कळंत्रे , संस्थेने सर्व पदाधिकारी, नातेवाईक बाचणी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.साळवी बी .डी. सरांनी केले तर सूत्रसंचालन व आभार श्री शेलार एम. बी . केले.
