चंद्रपूर : मुल (सतीश आकुलवार) दिनांक 24/11/2021 रोज बुधवारला चिमढा गावांत
उर्वरीत नागरिकांना कोविड लसीकरण घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली ज्या नागरिकांनी 1ला डोज घेतला आहेत त्यांना दुसरा डोज घेण्याकरिता घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
तसेच ज्यांनी अजून कोविड लसीकरणचा एकही डोज घेतला नाही त्यांच्या घरी सुध्दा भेटी देण्यात आल्या सदर भेटीदरम्यान चिमढा गावचे सरपंच मान श्री कालिदासजी खोब्रागडे साहेब, उपसरपंच मान योगेशजी लेनगुरे साहेब, पोलीस पाटील मान श्री जमनादास गोंगले साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मान श्री ऋषीदेवजी नागोसे ,ग्रामपंचायत सचिव मान वनिता कोडापे मॅडम, आरोग्य सेवक मान विलासजी आकुलवार ,जि प शाळेचे मुख्याध्यापक मान सौ ज्योत्स्ना उपलेंचवार मॅडम, शिक्षक मान श्री जितेंद्र बलकी सर, शिक्षिका मान कविता कोडपे मॅडम, अंगणवाडी सेविका लेनगुरे आणि गुरनुले ताई, आशा वर्कर गीताताई पोहनकर तसेच ग्रामपंचायत शिपाई मोहूर्ले आणि कावळे तसेच गावातील सुजाण नागरिक हजर होते लसीकरण करण्याकरिता गावात जनजागृती केली तेंव्हा लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि लसीकरण घेणारे बाकी नागरिक लसीकरण घेण्यासाठी गेले बाहेर गावी गेलेल्यांना लवकरच आपले दोन्ही डोज पूर्ण करावे असे सांगितले गेले
सदर कोविड लसीकरण जनजागृती कार्यक्रमासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
असेच पुढे सहकार्य करावे हिच अपेक्षा.