section and everything up until
* * @package Newsup */?> पत्रकार दिनाच्या औचित्याने न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हा (DMA) च्या वतीने स्पर्धेचे आयोजन ! | Ntv News Marathi

चंद्रपुर : दरवर्षी सहा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात “पत्रकार दिन” साजरा केल्या जातो. यावर्षी 6 जानेवारी 2022 पत्रकार दिनाचे औचित्याने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी डिजिटल मीडिया असोसिएशनच्या (DMA) माध्यमातून न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल साठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेते होणाऱ्यांना प्रथम व द्वितीय व प्रोत्साहन स्तराचे पुरस्कार देण्यात येत आहे. ही स्पर्धा संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात मध्ये न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असून रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी एमडीए, चंद्रपुर जिल्हा (DMA) कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आपापल्या न्यूज पोर्टल व यूट्यूब वर या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांना
(१) चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ समस्यांवर आपले वृत्त
(२) यशोगाथा व व्यक्तिविशेष
(३) वन्यप्राण्यांच्या हमला समस्या व समाधान

या तीन विषयांवर प्रकाशित वृत्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत या दिवसांमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तांनाच प्राधान्य दिले जाईल. तीन वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वरील विषयावर वृत्त प्रकाशित करणाऱ्यांना प्रथम पारितोषिक रोख
₹ रोख रुपये प्रथम,
₹ रोख रुपये द्वितीय
शाल, श्रीफळ व सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमण्यात येणार असून परीक्षक मंडळाचे निर्णय हा अंतिम राहणार आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित प्रत्येकानी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या परिस्थितीत सोशल मीडिया हा फार जास्त प्रमाणात वापरला जात आहे. सोशल मीडिया ला मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहे. स्पर्धेच्या युगात आपण सर्वश्रेष्ठ व उत्कृष्ट राहावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन डिजिटल मिडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्ह्यच्या माध्यमातून करण्यात आले आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित जास्तीत जास्त न्यूज पोर्टल धारक व यूट्यूब चैनल वाल्यांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान या माध्यमातून आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *