चंद्रपूर : मूल (प्रतिनिधी) आज दी. 25 -11-2021 रोज गुरुवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली!
सदर बैठक दुशांत महाडोळे ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक 13 परिसर येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची व महिला भगिनींची बैठक घेण्यात आली . सदर बैठकीचे प्रास्ताविक दुशांत महाडोळे ह्यांनी केले ! सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ, प्रमुख उपस्थिती म्हणून शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे , संदीप तेलंग उपस्थित होते ! सदर बैठकीमध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.

सदर बैठकीत केवळराम आंबोने, तुकाराम वरघंटीवार,प्रमोद बांबोळे, निखिल गुज्जनवार, पियुष सादमवार, रवी चौखुंडे , निलेश मूठ्ठावार , अक्षय गुज्जनवार, पियुष मोहूर्ले रोहित गुज्जनवार, अक्षय दुमेवार, नंदू नलेंगवार , राम दुम्मेवार, किशोर जीडगेलवार, सचिन दुम्मेवार, कविता जीडगेलवार, ललिता नलेंगवार , विजया नागभीडकर, सौ सुचिता मोहूर्ले, सौ सविता मोहूर्ले, वैशाली नागभीडकर, सौर मनीषा वरघंटीवार, गीवा अंबोने ,सुमित्रा मोहूर्ले, कल्पना मेश्राम , प्रताप तिरनकर, रवींद्र जिडगेलवार, साहिल वरघनटीवार, भुमेश मोहूर्ले, पत्रा बाई मेश्राम, कविता वरघंटीवार, मनीषा वरघंटीवार, कल्पना गुज्जनवार, सुमित्रा मोहूर्ले , सुनीता भोयर रजनी कवाडकर, निखिल गुज्जनवार, साहिल डांगे, सारिका डांगे, मंगला नलेंगकर,रमेश मुठ्ठावार, पुष्कर गुज्जनवार आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !
सदर बैठकीमध्ये उपस्थित मधून कार्यकारनी करण्यात आली !
युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!

तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला भास्कर खोब्रागडे व महेश जेंगठे , यांनी युवकांना व महिला भगिनीला दिले.