चंद्रपूर : (सतीश आकुलवार) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल तालुक्यात अधिकाधिक मजबूत व्हावी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांचे हात मजबूत होण्याकरिता ह्या अनुषंगाने मूल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये मोठे फेरबदल केलेले आहे ! कार्यकर्त्यांत अधिकाधिक नवचैतन्य येण्याकरिता मूल तालुक्यातील कार्यकारिणीत फेरबदल करून नव्याला संधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अत्यंत प्रामाणिक पक्षनिष्ठ असलेले जेष्ठ पदधिकारी श्री किसनराव वासाडे ह्याची नियुक्ती तालुका अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे ! सदर नवीन नियुक्तीने मूल तालुक्यात पक्ष बळकट होईल ! अशी आशा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांनी केलेली आहे ! किसनराव वासाडे ह्यांना मूल तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर,जेष्ठ नेते निपचंद शेरकी , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुकाध्यक्ष निताताई गेडाम, महिला शहर अध्यक्ष अर्चना चावरे , युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार ,अनिकेत मारकवार ,जेष्ठ नेते हेमंत सुपणार, प्रशांत भरतकर, दुशांत महाडोळे , संदीप तेलंग, नंदू बारस्कर, अजय त्रिपट्टीवार , विकास रणदिवे, दुर्वास घोंगडे, साईनाथ गुंडोजवार, बालाजी लेनगुरे, नितेश म्याकलवार, जुगल महाडोळे , दीपक महाडोळे , श्याम लाटेलवार पदाधिकारी ह्यांनी अनेकांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत !