चंद्रपुर जिल्हयात व पोलीस स्टेशन मुल कार्यक्षेत्राअंतर्गत बनावट पोलीस व पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी वसुल करणारी टोळी जेरबंद करण्यात मूल पोलिसांना यश आले ।।
मूल तालुक्यातील चिरोली येथे आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३६ वर्ष रा रेंगेपार ता साकोली जि भंडारा, हल्ली मुक्काम भिवापुर वार्ड चंद्रपुर
सौ संगीता बादल दुबे वय २७ वर्ष रा रेंगेपार ता साकोली जि भंडारा, हल्ली मुक्काम भिवापुर वार्ड चंद्रपुर
अजय विजय उईके वय ३१ वर्ष रा गजानन मंदीर रोड, शितला माता मंदीर च्या मागे चंद्रपुर देवेंद्र चरणदास सोनवणे वय ३० वर्ष रा निलज, ता साकोली जि भंडारा, हल्ली मुक्काम भिवापुर वार्ड चंद्रपुर
हे सर्व आरोपींनी संगणमत करून दिनांक ०३/०७/२०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल हददीतीत मौजा चिरोली येथे सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३६ वर्ष रा चिरोली ता मुल यांच्या घरी एक पाढ-या रंगाची अर्टीका कार क एम एव ३४, सि जे ५८२४ बी जावुन पोलीस भरारी पथक चंद्रपुर असल्याची बतावणी करून त्याचे घरी मिळून आलेल्या विनापरवाना दारू वर कार्यवाही करण्याचे धाक दाखवुन त्यास १५,०००/-रू याची मागणी करून तडजोड अंती १०,०००/-रू ची खंडणी वसुल केले तसेच मौजा डोंगरगाव ता मुल येथील नामे एजाज शेख ईब्राईम शेख याचे अंडा आमलेट दुकाणात जावुन त्याचे दुकाणात दारू पिणारे व्यक्ती मिळुन आल्याने त्याचे विरूध्द कार्यवाही करण्याचे धाक दाखवुन त्यास १०,०००/- रू ची मागणी करून तडजोड अंती ५,०००/-रू ची खंडणी वसुल केले अश्या लेखी तकारवरून पो स्टे मुल येथे अपराध क्रमांक २५३/२०२५, कलम ३०८ (२), २०४,३ (५) बि एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयात आरोपी क ०१ ते ०३ पत्रकार असुन अटक करण्यात आले असुन त्यांचे कडुन एक पाढ-या रंगाची अर्टीका कार क एम एच ३४, सि जे ५८२४ किं अं १२,५०,०००/-रू, २) दोन विटो कंपणीचे व एक ओपो कंपणीचे मोबाईल प्रत्येकी किंमत १५,०००/- रू असा एकुण अंदाजे ४५,०००/-रू, ३) नगदी १५,०००/-रू असा एकुण १३,१०,०००/- रु चा माल जप्त करण्यात आले

ही कारवाही पोलीस अधीक्षक
मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी केली यावेळी सपोनि सुबोध वंजारी, जमीरखान पठाण, नरेश कोडापे,
भोजराज मुंडरे, विभाजी देवकते संदिप चौधरी,शंकर बोरसरे उपस्थित होते पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी।चंद्रपुर