घुगुस, चंद्रपूर :
भारतीय मजदूर संघाने २३ जुलै २०२५ रोजी आपला ७० वा स्थापना दिवस घुगुस येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. वेकोली वणी क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येत ध्वजपूजन केले आणि मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला. यासोबतच, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या, रेनकोट आणि शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय खदान मजदूर संघाने वेकोली विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. भारतीय कोळसा खदान मजदूर संघ, वणी-ताडाळीच्या वतीने वणी क्षेत्र आणि कंपनी लेबर संघटनेच्या १४ सूत्री मागण्यांसाठी २४ जुलै रोजी तसेच सप्टेंबर महिन्यात प्रांतीय स्तरावर आंदोलन करून जनजागरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. क्षेत्रातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या आंदोलनाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला विजय मालवी (अध्यक्ष), अनंत कुमार गुप्ता (महामंत्री), सुभाष तातावर (कोषाध्यक्ष), सुरेश भोयर (संयुक्त महामंत्री), ब्रिजेश सिंह (कल्याण समिती सदस्य, वणी क्षेत्र), डी.बी. राठोड, लखन हिकरे (उपाध्यक्ष, वणी क्षेत्र), प्रभारी विनोद ढोमणे, हरिदास सोनेकर (उपाध्यक्ष, सी.डब्ल्यू.एस. प्रभारी), विनोद लोहबले आणि राजेंद्र पाचवाई यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच त्यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिनिधी धर्मपाल कांबळे,
एनटीव्ही न्यूज मराठी, चंद्रपूर.