SAMBHAJINAGAR | साखरपुडा उरकून निघालेल्या गाडीवर घाटामध्ये कोयता आणि तलवारींनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून वधूला कारने पळवून नेल्याचा आरोप आहे.
मोहाडी उपनगरातील कुटुंब मुलाच्या साखरपुड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. साखरपुड्यानंतर ठरलेल्या वधूसह कुटुंब रात्री घराकडे निघालं. वेरूळ घाटात चारचाकी जाताच अज्ञात तिघा जणांनी तलवार आणि कोयत्यांनी वाहनावर हल्ला केला.
