गंगापूर प्रतिनिधी:अमोल पारखे

गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथील स्व.मा.खा. साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक रंजक शिरसाट सर यांची कन्या कु. डॉ.आकांक्षा ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन स्व.आई नेत्रादेवी व वडील रंजक शिरसाट यांचे स्वप्न तिने जिद्दीने व चिकाटीने पूर्ण केले. आज समाजामध्ये जिल्हा परिषद शाळेऐवजी इंग्लिश मिडीयम शाळेत मुलांना शिक्षण घेण्या करीता चढा ओढ सुरू असताना कुमारी डॉक्टर आकांक्षा हिने दाखवून दिले की जिल्हा परिषद शाळा देखील काही कमी नाही. डॉक्टर आकांक्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मुद्देश वाडगाव येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सेंट मेरी हायस्कूल वाहेगाव येथे व नंतर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण
श्रीमती राजाबाई माधवलाल धूत कन्या हायस्कूल गंगापूर येथे होऊन महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले.
वैद्यकीय शिक्षण बी. के. वालावरकर वैद्यकीय महाविद्यालय चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे प्रथम श्रेणी मध्ये MBBS उत्तीर्ण होऊन आई (नेत्रादेवी)सुनिता व वडील रंजक यांचे स्वप्न पूर्ण केले.अचानक झालेल्या आईच्या निधनाने खचुन न जाता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अभ्यास करून मुद्देशवाडगाव या ग्रामीण भागात MBBS बनण्याचा तिने मान मिळवला.या तिच्या यशामध्ये तिची आई सुनिता रंजक शिरसाट यांचे फार मोठे योगदान आहे.आज दिनांक १५ जुलै रोजी गंगापूर तालुक्यातील उपविभागीय आरोग्य केंद्र भेंडाळा येथे वैद्यकीय अधिकारी पदावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोरे साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा यांनी रुजू करून घेतले. या निमित्त गंगापूर पंचायत समिती आरोग्य विभागात आरोग्य पर्यवेक्षक रामचंद्र निकम,प्रीती येरमुले,
योगेश कंचेवाड यांच्या उपस्थितीत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.रंजक शिरसाट यांनी आपले मुले अतिशय सुसंस्कृत व उच्च शिक्षित करून उच्च पदावर नियुक्त केले आहे. मुलगी डॉ.आकांक्षा ही डॉक्टर तर मुलगा अक्षय रंजक शिरसाठ हा मातोश्री कालावती उच्च माध्यमिक हायस्कूल हर्सूल सांगवी येथे सहशिक्षक पदावर कार्यरत आहे.आज हा सोहळा पाहण्यासाठी आई नेत्रादेवी असायला पाहिजे होती परंतु आई सुनिता यांनी ती उणीव भरून काढली. या यशा बद्दल मुद्देशवाडगाव व परिसरातील जनतेने अभिनंदन करून डॉक्टर आकांक्षा हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हातुन रुग्णांची सेवा घडून आई-वडील व गावांचे नाव मोठे व्हावे असे गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी डॉ.सुनील उबाळे,डॉ. गोरख तूपलोंढे ,ऍड.राजेंद्र दारुंटे, एड. सचिन भुसारे, रंजक शिरसाठ, महेश कसाने,सुजित सोनवणे, रामनाथ शिराळे मामा,शांतवन उबाळे, संजय वाडगावकर, दिलीप बनकर ,पत्रकार सदाशिव जंगम, पत्रकार लक्ष्मीकांत माघाडे,
अशोक उदमले, महेश कोतकर, आकाश पारखे, शेख युसब, नंदू पवार ,राजू पारखे,लता तुपे (सहशिक्षिका), शेख फकीर मोहम्मद, प्रवीण सोनवणे, भगवान सोनवणे, राधू जाधव,मच्छिंद्र मोरे, सुरेश पाटील दारुंटे,गुलाबराव दारुंटे,भास्कर कोळसे ,दीपक उबाळे, अक्षय शिरसाट ,
तुळशीराम चव्हाण, दीपक शिरसाट,दता कणसे असे शेकडो समाज बांधव व गावातील सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *