section and everything up until
* * @package Newsup */?> वाशिम : पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचा प्रोत्साहनपर ऊपक्रम | Ntv News Marathi

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी/अंमलदार यांना प्रमाणपत्र व रोख बक्षिस देऊन केले सन्मानित

वाशिम : श्री. बच्चन सिंह जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम यांनी जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यानंतर पोलीस अंमलदार यांचे मागील दोन वर्षापासुन रखडलेले पदोन्नतीचे प्रकरण मार्गी लावुन तब्बल २५० पोलीस अंमलदार यांना पदोन्नती दिल्या. तसेच वेळोवेळी आपआपल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना सन्मानित करण्यात येते.

दिनांक २५/११ / २०२१ रोजी सन २०२१ मध्ये उत्कृष्ट तपास करुन गंभीर गुन्हयाची उकल करुन गुन्हा ऊघडकीस आणलेल्या अधिकारी/अंमलदार,श्वान पथक यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.नुकताच रिसोड पोलीस ठाणे येथे दाखल ७८३/२१ कलम ३९४ भादवी मध्ये अर्धा किलो सोने देतो असे सांगुन फिर्यादीस काठीने मारहाण करुन जख्मी केले व फिर्यादी जवळील ५,००,०००/- लुटुन नेले या गुन्हयातील ३ आरोपी २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन गुन्हयातील ४.२०,०००/- रु रोख व गुन्हयात वापरलेले मोबाईल व मो/सा असा एकुण ४,९७,०००/- चा मुददेमाल हस्तगत केला. नमुद कारवाईत पोलीस निरिक्षक जाधव,सपोनि विजय जाधव, पोह सुनिल पवार,पोना राजेश गिरी,अश्विन जाधव,श्रीराम नागुलकर,पोशि शुभम चौधरी,चापोना गजानन जाधव यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शिरपुर पोलीस ठाणे येथील अपक्र २९२/२१ कलम ३९५ भादवी मधील दोन आरोपींना २ तासात अटक करुन आरोपीकडुन २,५०,०००/- रु व एक मोबाईल असा माल हस्तगत करुन गुन्हा उघडीस आणला. नमुद कारवाईत पोस्टे शिरपुर येथील पोनि श्री सुनिल वानखेडे, सपोनि जगदीश बांगर,पोह राजेंद्र वानखेडे,पोह संतोष पाईकराव,पोना श्रीकृष्ण नागरे,पंजाब घुगे,विनोद धनवट,पोशि प्रविण गोपनारायण,मनोज ब्राम्हण,मपोशि ममता इंगोले यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मामित करण्यात आले.वाशिम शहर पोलीस ठाणे अपक्र १३०९7 २१ कलम ४६१,३८१ भादवी मध्ये अल्युमिनियम चोरी करणाऱ्या ३ आरोपींना १२ तासांच्या आत अटक करुन २,९४,०००/- अॅल्युमिनियम व २.५०,०००/- टाटा एसीई वाहन असा एकुण ५,४४,०००/- चा मुददेमाल जप्त केला नमुद कारवाईत पोनि धृवास बावनकर,सपोनि रमाकांत खंदारे,पोह लालमणी श्रीवास्तव,पोना रामकृष्ण नागरे,पोशि ज्ञानदेव म्हात्रे,विठठल महल्ले,संदीप वाकुडकर यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मालेगाव पोलीस स्टेशन अपक्र ४५१/२१ कलम ३०२,३४ भादवी मधील मृतक व आरोपी यांच्यात दारु पिण्याच्या कारणावरुन वाद झाला सदर गुन्हयातील आरोपी व त्याची महिला साथिदार यांनी सनगमत करुन मृतकास मारहाण करुन मारले असल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला नमुद कारवाईत मालेगाव पोलीस ठाणे पोलीस निरिक्षक प्रविण धुमाळ,पोउपनि सारिखा नारखेडे,पोह कैलास कोकाटे,गजानन झगरे,सुधिर सोळंके,पोशि गणेश बोडखे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वाशिम जिल्हयातील श्वानपथकातील अधिकारी/अंमलदार तसेच श्वान लुसी हयाना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मा.बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हयातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांना असा संदेश दिला की, अशाप्रकारची भरीव कामगिरी केलेल्या अधिकारी/अंमलदार यांचे पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप पडेल परंतु कायदयाचे उल्लंघन करणाऱ्या,बेशिस्त वागुन पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणा-या अधिकारी/अंमलदार यांना कायदयाचे बडगा दाखविला जाईल.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *