धाराशिव :
उमरगा लोहारा तालुक्यातील जवळपास नऊ गावातील महिला पुरुषांना उमरगा शहरातील महिला समुपदेशन कक्षात त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम दि 6 जुलै रोजी घेण्यात आले.
त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत संपन्न या जनजागृती कार्यक्रमात कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला.महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे,स्वरक्षण,कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास संस्थेच्या वतीने कालिंदी पाटील व प्रणाली पात्रे,महादेवी स्वामी समुपदेशक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कसे करायचे याचे कायदेशीर माहिती महिलांना देण्यात आली. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 हा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. 2005 अंतर्गत लागू होणारे कलम, 18 संरक्षण आदेश, कलम 19 वैवाहिक घरात राहण्यासाठी निवास आदेश, कलम 20 आर्थिक आदेश ज्यामध्ये स्वतःच्या आणि त्यांच्या मुलासाठी देखभालीचा समावेश आहे. कलम 21 ज्यामध्ये मुलांचा तात्पुरता ताबा, कलम 22 ज्यामध्ये पिडीत महिलेला झालेल्या नुकसानीसाठी भरपाईचा आदेश; अशा नानाविध कायदेशीर मुद्द्यांवर माहिती देण्यात आली व महिलांच्या वेगवेगळ्या अडचणी जाणून घेऊन त्यांना समुपदेशन करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमात मुरूम, मदनसूरी, वाघदरी, जेवळी, चिंचोली (ज), व्हंताळ,गुंजोटी,तुरोरी, जकेकुर आदी गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
प्रतिनिधी सचिन बिद्री
एनटीव्ही न्यूज मराठी – धाराशिव