धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्य घडवण्याकरता दोन किमी चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो मागील आनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन व राजकीय मंडळी दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थी तसेच पालक वर्गातून तीव्र स्वरूपात नाराजगी व्यक्त होत आहे इलेक्शनच्या काळात राजकीय मंडळी आश्वासन देतात परंतु निवडून आल्यावर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याचा चित्र दिसत आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तरी या रस्त्याचे काम होईल?अशी एक अपेक्षा विद्यार्थी तसेच पालक वर्गातून होत आहे

प्रतिनिधी रफिक पटेल येडशी धाराशिव मो. 9922764189