(सचिन बिद्री)
धाराशिव जिल्ह्यातील तेली समाज बांधवांच्या वतीने राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक 08 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शांताई मंगल कार्यालय उमरगा येथे आयोजन करण्यात आले आहे.संबंधित नागरी सत्कार सोहळ्याचे निमंत्रण ना. बावणकुळे यांना मुंबई येथील चित्रकुट निवासस्थानी भेट देऊन आमंत्रित करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, उमरगा तेली समाज संघटनेचे कार्याध्यक्ष पिंटू कलशेट्टी,मार्गदर्शक महादेव साखरे, युवा नेते बाबुराव कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. समाज मेळावा व नागरी सत्कार अश्या स्वरूपाचे सदर कार्यक्रम दि 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.