वारं कुणीकडे..?स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका..!
(सचिन बिद्री)

धाराशिव जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित देशमुख यांच्याशी येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत,नगरपालिका,आणि जिल्हापरिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा केली दरम्यान आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात उमरगा तालुक्यात आयोजित मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे आश्लेष मोरे यांना आश्वाशीत केले आहेत.

यावेळी उमरगा तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार,सरचिटणीस विजय वाघमारे, आश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर,नितीन कोराळे,अमित रेड्डी,बालाजी मोरे,गणेश पाटील,महेश जाधव,अनिल साळूंके,विकास कोराळे आदी उपस्थित होते.