फुलचंद भगत
वाशिम:-शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा हा आहे.पुर्वापारपासून शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा सण असलेला पोळा शुक्रवार दि.२१ आॅगष्ट रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी परंपरेनुसार सर्जा-राजाची खांदेमळण करण्याची प्रथा शेतकऱ्यांनी २० आॅगष्ट रोजी पार पाडली. लाडक्या बैलांची स्वच्छ आंघोळ घालून आणि तूप व हळदीने मालिश करून उद्याच्या जेवणाचे आवतन दिले.
प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी यादिवशी सर्व कामे बाजूला सारून केवळ बैलांच्या सजावटीत गुंतलेले असतात. यंदाही ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, त्यांनी आॅगष्टपासून पोळ्याच्या तयारीला सुरूवात केली असून नदी-नाल्यांवर नेत बैलांना स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. ज्वारीचे फळ, वरण, भरडा यासह भोजन देवून आज आवतन घ्या आणि उद्या अर्थात पोळ्याच्या दिवशी जेवायला या, असे बैलांना सांगण्यात आले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *