प्रतिनिधी : नळदुर्ग
धाराशिव जिल्ह्यात निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे नळदुर्ग चे पत्रकार यांनी आपल्या समाजकार्यातून नवा आदर्श घालून दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्याशी जोडले गेले असून, विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांनी वेळोवेळी रक्तदान करून समाजातील रक्तदात्यांना प्रेरित केले आहे.
व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित. सर्व रोग निदान शिबिरामध्ये त्यांनी सहभागी होत समाजहिताचे कार्य अधिक बळकट केले. या शिबिरादरम्यान नेत्रदानाचे आव्हान करण्यात आले असता, आयुब शेख यांनी तत्काळ पुढाकार घेत स्वतः नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या निर्णयाचे वैद्यकीय अधीक्षक व व्यापार मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत केले.
समाजासाठी झटणारा आणि लोकांसाठी सदैव तत्पर असणारा पत्रकार असा आयुब शेख यांचा लौकिक आहे. आता नेत्रदान करण्याचा संकल्प करून त्यांनी समाजकार्यातील एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले असून, “आयुब शेख यांच्यासारखे यांचा सामाजिक कार्य हेच खरी प्रेरणा आहेत,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
व्यापार गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर खजुरे शिवाजीराव मोरे व गावातील स्थानिक नेते वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते