*N TV NEWS MARATHI*
जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथे गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या आरोपीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. ५) जेरबंद केले. संदीप बंडू मारकड (वय २१, रा. बटेवाडी, ता. जामखेड) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध शस्त्रे वाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाली होती की, जामखेड तालुक्यातील बटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेजवळ एक व्यक्ती उभा आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा व काडतूस आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील गावठी कट्टा व जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केले. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.