जालना: जाफराबाद येथील सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर संचलित सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. राहुल भाऊ म्हस्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून संगणक शास्त्र विषयात पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब म्हस्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख वक्ते म्हणून प्रो. डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सचिव प्रा. डॉ. राहुल भाऊ म्हस्के, प्रा. साहेबराव गायकवाड, उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे, प्रा. डॉ. एस. के. सर्जे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश मुरकुटे, प्रा. वाल्मीक वाघ आणि प्रा. दांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मूल्य शिक्षण व सांस्कृतिक समिती प्रमुख प्रो. डॉ. संतोष पहारे यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर विद्यार्थी वैभव देवरे, रजनी चव्हाण, आदित्य साळवे, रेणुका सगट आणि साक्षी साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रो. डॉ. विजय पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून आधुनिक शिक्षण पद्धतीवर भाष्य केले. सत्कारानंतर बोलताना प्रा. डॉ. राहुल म्हस्के यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील कंत्राटी कामगार धोरण शिक्षण क्षेत्रासाठी कसे हानिकारक आहे, यावर अभ्यासपूर्ण मत मांडले. तसेच त्यांनी विनाअनुदान धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावरही भाष्य केले. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के यांनी भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि प्राध्यापकांनी केवळ अभ्यासक्रमच नव्हे तर गोरगरीब विद्यार्थ्यांना सामाजिक ज्ञानही द्यावे असे आवाहन केले.

प्रतिनिधी राहुल गवई,

एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *