(छ. संभाजीनगर प्रतिनिधी)

छत्रपती संभाजीनगर: शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (ANC) मोठी कारवाई करत, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा पुरवठा करणारे आंतरराज्यीय मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कफ सिरप बॉटल्सचा साठा जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन आरोपींचा समावेश असून, या प्रकरणी दुर्गेश रावत, धर्मेंद्र प्रजापती, कल्पेश अग्रवाल आणि सय्यद नबी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

शहरात तरुणांना नशा करण्यासाठी या कफ सिरपचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जात होता. गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करून या रॅकेटचा पर्दाफाश केला.

या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये अजूनही काही आरोपी सामील असण्याची शक्यता आहे. याविषयी बोलताना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केले की, या रॅकेटमध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात नशेसाठी कफ सिरपचा अवैध पुरवठा करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तपास पूर्ण झाल्यावर या रॅकेटचे जाळे आणखी किती मोठे आहे, हे स्पष्ट होईल.

एनटीव्ही न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *