(सचिन बिद्री:धाराशिव)

उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. उमरगाच्या वतीने सन २०२४ -२५ सालाचा १०% लाभांश बँकेच्या सभासदांना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर देण्याचा निर्णय चेअरमन प्रा सुरेश दाजी बिराजदार जाहीर केला होता .तसेच भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासदांना साखर दि १७ पासून वितरण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .दीपावली व पाडव्याच्या निमित्ताने सर्व शेतकरी सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी जाहीर केले आहे .
धाराशिव जिल्हा तसेच उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अत्यंत अडचणीत सापडला असल्याने भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेत चेअरमन प्रा सुरेश बिराजदार यांनी सभासदांना १०% लाभांश देण्याचे जाहीर केले होते .त्याप्रमाणे भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या सर्व सभासदांचे लाभांश त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत .भाऊसाहेब बिराजदार बँकेत ज्यांचे खाते नाही त्यांनी खाते काढून घ्यावे .ज्यांची केवायसी झालेली नाही अशांनी कागदपत्रांची पूर्तता करून खाते चालू करून घ्यावेत . असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे यांनी सभासदांना केले आहे . तसेच कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सर्व शेतकरी सभासदांना सवलतीच्या दरात साखर वितरण करणार असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे दि १७ पासून या साखर वाटपाचा शुभारंभ समुद्राळ येथील कारखान्यावर करण्यात आला आहे . दि २० पर्यंत ही साखर वितरण होणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दीली आहे .यामुळे भाऊसाहेब बिराजदार बँक व भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *