(सचिन बिद्री:धाराशिव)
मराठी साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणारा ‘प्रसाद ‘ दिवाळी विशेषांक 2025 – 26 चे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. हा प्रकाशन सोहळा उमरग्यातील शासकीय विश्राम गृहात आयोजित करण्यात आला होता. ज्यात साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कमलाकर भोसले, पोलिस अधिकारी श्रीकांत भराटे, डॉ. प्रतिक जोशी, के.पी. बिराजदार, प्रा. डॉ. विनोद देवरकर, भुमिपुञ वाघ, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष बाबा औटी, प्रा.युसुफ मुल्ला, विकास गायकवाड, प्रदीप भोसले,शिक्षक ज्ञानेश्वर माशाळकर, अजित ( बंडू ) नेलवाडे, वीज कामगार महासंघाचे मोहन गुरव, शिक्षक परमेश्वर साखरे, दत्ता सोनकवडे, सचिन पाटील, चेतन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन समारंभ कार्यक्रमात बोलताना उपस्थित सर्व मान्यवरांनी दिवाळी अंकाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक तथा रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष कमलाकर भोसले म्हणाले, “आजच्या वेगवान जीवनात दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीला वाचकांशी जोडून ठेवण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. यातून केवळ मनोरंजन नव्हे, तर विचारांना नवी दिशा मिळते.” हा अंक दर्जेदार व सुंदर सजावटीने परिपूर्ण आहे. साहित्यिक महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश यासह अमेरिका, इजिप्त, जपान, इटली, स्विझरलँड, दुबई या देशात राहणारे मराठी भाषीक साहित्यिकांनी दरवर्षी साहित्य पाठवत आहेत. यापुढे हा अंक या पेक्षा मोठा व्हावा व सतत प्रगती करत सध्या बारा वर्षे झाली आहेत. यापुढे शंभराव्या अंकापर्यंत साहित्य पाठवणार असल्याचे सांगितले.
यावेळी अंकाचे मुख्य संपादक लक्ष्मण पवार यांनी यावेळी ‘प्रसाद ‘ अंकातील विशेष लेख, कथा आणि कविता व इतर साहित्यिकांची माहिती दिली. अनेक नवोदित लेखकांना संधी देण्यात आली आहे. हा अंक देशपातळीवर आहे. यापुढे इतर देशांतील मोठमोठे पुरस्कार मिळवत यश शिखरावर पोहचावे असे आवाहन यावेळी केले.
डॉ. प्रतिक जोशी, के.पी. बिराजदार, पोलिस अधिकारी श्रीकांत भराटे, साहित्यिक भूमिपुत्र वाघ यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा देत, अंकाचे मुखपृष्ठ व त्यातील विषयांचे कौतुक केले. हा अंक वाचकांना नक्कीच आवडेल आणि तो त्यांच्या संग्रही राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोहळ्याला अनेक साहित्यप्रेमी, लेखक आणि वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘प्रसाद ‘ दिवाळी विशेषांकाचे उपसंपादक नसरोदिन फकीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला आणि मराठी साहित्यविश्वात एका नव्या अंकाचे स्वागत झाले.
