पाथर्डी (अहिल्यानगर): नगर-राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी राज्यमंत्री, आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राहिलेले माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले साहेब यांचे शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

स्वर्गीय कर्डीले साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाथर्डी आणि शेवगांव तालुक्याच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

ही शोकसभा शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता पाथर्डी येथील लोकनेते आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालय, कोरडगांव रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय शोकसभेला पाथर्डी आणि शेवगांव तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी, तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिनिधी भिवसेन टेमकर,

एनटीव्ही न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *