CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील रहिवासी श्री. आबासाहेब बालचंद मनाळ यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राजपत्रित अधिकारीपदी निवड मिळवली आहे. श्री. मनाळ यांनी बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) हे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (पुणे) येथून पूर्ण केले आहे.
सध्या ते उपमुख्याधिकारी म्हणून उरण नगरपरिषद, नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण वाहेगाव ग्रामस्थांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आबासाहेब मनाळ हे मेहनती, अभ्यासू आणि शिस्तप्रिय स्वभावाचे असून त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व कठोर परिश्रमातून हे यश मिळवले आहे. वर्गमित्र, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले देखील इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर उंच भरारी घेऊ शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
गंगापूर प्रतिनिधी : अमोल पारखे
