(गंगापूर प्रतिनिधी – अमोल पारखे)
गंगापूर – वैजापूर तालुक्यात शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीरशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोदजी घोसाळकर, आणि विरोधी पक्ष नेते श्री. अंबादासजी दानवे यांच्या चर्चेनंतर व सूचनेनुसार गंगापूर–वैजापूर तालुक्यात शिवसेनेच्या विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या नियुक्त्यांमध्ये शाखाप्रमुखपदी संजय पगारे, दलित आघाडी उपतालुकाप्रमुखपदी अमोल पारखे, तसेच सहकार सेना उपतालुकाप्रमुखपदी दादासाहेब तगरे यांची निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्तीपत्रे शिवसेना तालुका प्रमुख सुभाष पाटील कानडे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मणभाऊ सांगळे, अंकुशराव सुंब (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना गंगापूर–वैजापूर) आणि कृष्णा डोंणगांवकर (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना गंगापूर) यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे शिवसेनेचे संघटन अधिक सक्षम व मजबूत होईल, तसेच स्थानिक स्तरावर पक्षाचे कार्य अधिक जोमाने राबवले जाईल, असा विश्वास पक्ष विभाग प्रमुख पांडुरंग कापे तसेच उपतालुकाप्रमुख चेअरमन ऋषिकेश मनाळ या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
