• ‘सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर बचत गट, उमरगा’ यांच्या वतीने कार्यक्रम..!
  • सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप..!

धाराशिव, (दि. १२ डिसेंबर):

उमरगा, धाराशिव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले. उमरगा शहरातील नगर परिषद समोरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ‘सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर बचत गट, उमरगा’ यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.

अभिवादन सोहळा

प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूज्य भंते सुमंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बौद्धाचार्य मिलिंद डोईबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

सामाजिक उपक्रम

जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत माने नगर, उमरगा येथील निवासी मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना अल्पोपहार,फळे,पाणी बाटल्या यांचे वाटप करण्यात आले.

उपस्थित मान्यवर

यावेळी अविनाश भालेराव, जिवन सुर्यवंशी, किरण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर सरपे, मिलिंद कांबळे, धिरज कांबळे, शाक्यदिप कांबळे, भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष अनंतकुमार कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक माजी संस्कार प्रमुख राजेंद्र सुर्यवंशी यांनी केले. माजी तालुका सरचिटणीस संतोष सुरवसे यांनी आभार प्रदर्शन केले.


प्रतिनिधी सचिन बिद्री,

एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *