- एकूण २९ प्रकरणांमध्ये संमतीने तडजोड घडवून आणण्यात यश.
- २ कोटी ४ लाख ६१ हजार ६७२ रुपयांची विक्रमी वसुली.
- मोटार अपघात, भूसंपादन आणि दिवाणी प्रकरणांचा जागेवरच निपटारा.
- पक्षकारांचा वेळ आणि पैशांची बचत; प्रशासकीय यंत्रणेचे मोठे यश.
NANDED | कंधार येथील न्यायालयात ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या आदालतीला पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून २९ प्रकरणांमध्ये तब्बल २ कोटी ४ लाख ६१ हजार ६७२ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे.
या आयोजित लोक अदालतीस सकाळी ११:०० वाजता प्रारंभ करण्यात आला. यात प्रामुख्याने मोटार अपघात, भूसंपादन तसेच इतर दिवाणी स्वरूपाच्या एकूण २९ प्रकरणांमध्ये संमतीने तडजोड घडवून आणण्यात आली. प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यावर भर देण्यात आल्याने पक्षकारांचा वेळ व खर्चाची बचत होऊन अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा न्यायालयाचे पॅनल प्रमुख म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ बी. व्ही. चौधरी तसेच सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के. एस. खंडारे यांनी सामंजस्याने ही प्रकरणे निकाली काढली. या पॅनेलवर ॲड. एच. आर. घडीवाला व ॲड. एस. एस. कांबळे यांनी सहकार्य केले. तसेच सहायक अधीक्षक आर. के. गवळी, वरिष्ठ लिपीक जितेंद्र सिंदगीकर, पी. पी. चव्हाण, एस. एन. मुंडे, जे. एच. बनसोडे, बी. आर. कांबळे व एम. एस. नाईक यांनी या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
यावेळी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. बी. के. पांचाळ, डी. पी. गायकवाड, ॲड. अनिल डांगे, ॲड. बाबू पाटील, सुहास मस्के, श्रेयस धर्मापुरीकर, ॲड. दिव्या कुलकर्णी यांच्यासह अनेक वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
प्रतिनिधी शेख शादुल, कंधार
