पाच आरोपींवर गुन्हा दाखल,१७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
हिंगोली : जिल्ह्याभरात रात्रीला मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची तस्करी होत असल्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडुन धडक कारवाई करण्याची मोहीम सुरू असुन दि १३ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नरसी हद्दीतील कडती फाटा ते नरसी या रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मौजे कडती गावाजवळ रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यां वाहनावर कारवाई करण्यात आली आहे असुन त्याचप्रमाणे हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सवड गावाजवळ रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱे वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध वाळु तस्करी करणाऱ्यांरे वाहन पोलीसांनी जप्त करत पाच आरोपींवर विविध कल्मान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असुन १७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उद्यय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार विशाल घोळवे, राजु ठाकुर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सांवत,शेख जावेद, आकाश टापरे, यांच्या पथकाने केली असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.यापुढेही अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.