हिंगोली : स्व.बाबुरावजी पाटील उर्फ नाना यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोरेगाव येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते,सव्वा लाखाची जंगी लुट तर अनेक गरजुवंताना थंडी पासुन बचावासाठी गरम उबदार कपड्यांचे वाटप केले. स्व.बाबुरावजी पाटील नाना यांच्या पुण्यतिथी निमित्त गोरेगांव नगरीत अनेक मान्यवरांनी हाजेरी होती.
यावेळी स्व.बाबुरावजी पाटील नाना यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्रिकेट सामन्यांच्या सुरवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून क्रिकेट सामनाच्या स्पिच चे पूजा करून क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन विद्या शक्ती प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष श्री. भास्कररावजी बेंगाळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्व. बाबुरावजी पाटील नाना यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक गरीब गरजूवंताना थंडी पासून बचावासाठी गरम उबदार कपड्यांचे वाटप विवीध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्याला छत्रपती संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विशेष उपस्थिती म्हणून यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूलचे सचिव प्रशांत साहेबराव पाटील,विद्या शक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, सेनगाव पंचायत समिती सभापती संतोषराव खोडके,हिंगोली जिल्हा परिषद कृषी सभापती हिंगोली बाजीराव जुमडे,माजी सभापती रुपाजी कराळे,माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख,ज्ञानबा कवडे उपसभापती हिंगोली. भास्कर पाटील, सरपंच दासराव कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे साहेब, प्रदिप पाटील,एम डी खिलारी, ग्रामसेवक राजु साहेब, गजानन कावरखे, डॉ महेश पाटील,राहुल खिलारी युवा नेते,बंडु भिकाजी कावरखे पाटील,राजु कावरखे,माधव खिलारी,अनसर भाई,माधव सोपानराव खिलारी, शेख मोईन (क्रिकेट काॅमिटर), तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, डॉ आर.जी. कावरखे, गजानन पाटील लाला, डॉ दिपक खिलारी,संजय पातळे व्यापारी, सुनिल खिलारी,रंगनाथ पाटील पहेनिकर, भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थक तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.