पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी काढले निलंबनाचे आदेश

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायतीची निवडणूक 21 डिसेंबर मंगळवार रोजी पार पडली होती दरम्यान औंढा नागनाथ शहरातील नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयांच्या मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक पाचसाठी मतदान सुरू असतांना कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे अंगरक्षक पोलीसासह ईतर तेरा कार्यक्रर्ते यांनी पुर्वप्रवानगी न घेता मतदान केंद्रांवर अनाधिकृत पने येऊन आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याठीकाणी कर्तृत्वावर असलेले पोलीस कर्मचारी अतुल बोरकर,बंडु सिताराम राठोड,विजय कुमार भगवान जाधव,या तिन्ही पोलीस कर्मचारी यांनी मतदान केंद्रावर आलेल्या आमदार संतोष बांगर सह ईतर तेरा कार्यक्रत्यांना मतदार केन्द्रांच्या परीसरात येण्यास मनाई केली नसल्याने तिन पोलीस कर्मचारी तर आमदार संतोष बांगर यांचे अंगरक्षक पोलीस कर्मचारी दिगांबर ठेंगडे यांनी पुर्वप्रवानगी न घेता घेता मतदान केंद्रांवर प्रवेश केला या चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कसुरी अहवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे पाठवल्यावरुन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी चार पोलीस कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.