घरपोच लस सेवा देण्यासाठी “मिशन लेफ्ट आऊट” अभियानाला प्रारंभ-डॉ सचिन राठोड
हिंगोली : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय सेनगांव अंतर्गत कोविड-19 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व नागरिकांसाठी मिशन “लेफ्ट आउट” ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून त्याच अनुषंगाने आज सेनगांव शहरामध्ये लसीकरणा पासुन वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी जनजागृती करण्या सोबतच उर्वरित नागरिकांना लसिकरण मोहीमे अंतर्गत लस दिली जात आहे.
कोरोनापासुन स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी नागरीकानी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन राठोड यांनी केले आहे.