हिंगोली : कडोळी येथे भैय्या पाटील यांच्या वतिने आयोजित क्रीकेट संघात अलबक्ष गोरेगाव येथील क्रीकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला
पृ.पु.श्री.रमतेराम महाराज चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन कडोळी येथे भैय्या पाटील मित्र मंडळ गोरेगांवच्या वतिने ठेवण्यात आले होते या क्रिकेट सामन्यांचे आयोजक म्हणून गजानन पी.पाटील यांनी पाहले होते यामध्ये प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये, तर द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ११हजार रुपये तर चतुर्थ पारीतोषीक ७ हजार रुपये ठेवण्यात आले होते या क्रिकेट सामन्यांत उत्कृष्ट खेळ खेळत गोरेगाव येथील अलबक्ष क्रीकेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक ३१ हजार रुपये पटकावला असुन बक्षीस वितरण हिंगोली ,परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी गोरेगाव येथील अलबक्ष क्रीकेट संघाचा कोच शेख मोईन आणि शेख रफीक यांना देण्यात आले हा सामना खेळविण्यासाठी गजानन पी.पाटील या सह परदीप पाटील, गजानन कावरखे साई,आनील पाटील, व्यापारी तथा युवा कार्यकर्ते राजु किलचे,बाळु पाटील, आदींची उपस्थिती होती