जालना | २३ मे २०२६

जालना येथील प्रतिभावान विद्यार्थिनी Pooja Wayal हिने जिल्ह्याचे तसेच देशाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची प्रतिष्ठित NASA Educational Experience Program (USA) साठी निवड झाली आहे.

पूजा वायल हिला ISSC मध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी “Best Performer” हा सन्मान मिळाला. त्यानंतर अमेरिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या NASA च्या विशेष शैक्षणिक अनुभव कार्यक्रमासाठी तिची निवड करण्यात आली. ही उपलब्धी जालना जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना NASA Space Center ला भेट देण्याची, विज्ञान आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तसेच आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि अंतराळ विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पूजा वायल यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक तसेच सामाजिक संस्थांनी आनंद व्यक्त करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरेल.

🚀 “मेहनत आणि स्वप्नांची सांगडच यशाच्या उंच भरारीचे कारण ठरते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *