फुलचंद भगत
वाशिम:-बनावट दस्तऐवज सादर करुन जन्मनोंद करण्याचा घाट होत असतांना सदर नोंदीबाबत सबंधित अधिकार्याला संशय आल्याने प्रकरण चौकशी ठेवले परंतु नेमका या जन्मनोंदीबाबत रस कसा हे एका बाबीवरुन अधोरेखीत होत आहे,कारण सदर जन्मनोंदीसाठी डायरेक्ट आयुक्त कार्यालयातुन फर्मान काढल्याचे कळले असल्याने कुठेतरी याप्रकरणी पाणी मुरले याविषयी सर्वञ चर्चा होत आहे.या संपुर्ण बाबीची सखोल चौकशी करुन सत्य ऊजेडात आणा अशा मागणीचे निवेदन गौरव इंगळे यांनी प्रशासनाला दिले आहे.
एका जिल्ह्यात सहा.आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्यांचे जन्मनोंदीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत असुन बनावट व खोटे दस्तऐवज जोडुन आणी वरिष्ठाकडुन आदेश आणुन जन्मनोंद घेण्यास दबाव टाकत असल्याची चर्चा मंगरुळपीर येथील एका जन्मनोंदीच्या प्रकरणावरुन दिसते.यासंदर्भात लवकरत मोठे जनआंदोलन ऊभारुन या बनावट प्रकरणाचा भंडाफोड होणार असल्याची माहीती मिळाली आहे.सदर नोंदीसाठी खुद्द सबंधित अधिकार्यांनी अर्ज केला की,दुसर्यांमार्फत करवुन घेतला याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.मंगरुळपीर तालुक्यात बनावट दस्ताऐवजांचा आधार घेवुन जन्मांची नोंद करण्याची धडपड एका सहा.आयुक्त पदाच्या व्यक्तीकडुन होत असल्याचा आरोप होत असुन याप्रकरणात कोणकोण सहभागी आहेत हे लवकरच ऊजेडात येणे गरजेचे असल्याची जनमाणसातुन मागणी होत आहे.
स्थानिक रहिवासी नसल्यास प्रमाणपत्र देऊ नये?
अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करूनच निबंधकाने जन्म आणि मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म-मृत्यू नोंदीची अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी स्थानिक चौकशी अन् पंचनामा करून खात्री करावी, असे निर्देश देण्यात आलेत.विलंबाने जन्म मृत्यू आणि नोंदीबाबत कारणमीमांसेसह पडताळणी करावी, ज्या प्रकरणात सबळ पुरावे उपलब्ध होत नसतील, खोटे-बनावट पुरावे प्राप्त होत असतील तर तत्काळ अशा प्रकरणांची माहिती पोलिसांना देण्यात यावी.असे असतांनाही मंगरुळपीर तालुक्यातील त्या वादग्रस्त नोंदीप्रकरणी अजुन तरी कुणावर कारवाई केली नाही.याप्रकरणी वरिष्ठ काय भुमीका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
