महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्या अडचणी व गरजा प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने यावल नगरपरिषदेच्या वतीने पात्र महिलांचे विशेष सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

यावल नगरपरिषद हद्दीतील पात्र महिलांची माहिती संकलित करून त्यांना महिला-केंद्रित शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विशेषतः विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच ३५ वर्षांवरील अविवाहित महिलांची नोंदणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक गरजा समजून घेण्यास मदत होणार असून, पात्र महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यास त्याचा उपयोग होणार आहे. यावल नगरपरिषदेच्या वतीने २० ऑगस्ट २०२६ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सर्वेक्षण व नोंदणी केली जाणार आहे. पात्र महिलांनी आवश्यक माहितीसह यावल नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी. “महिला सक्षम तर समाज समृद्ध; चला, एक पाऊल सशक्तीकरणाकडे!” या संदेशातून नगरपरिषदेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *