यावल येथील वाणी गल्लीतील चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाची नुकतीच सभा झाली. यावेळी सालाबादप्रमाणे यंदाही मंडळाचा ५२वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त पाचही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उत्कृष्ट आरास सजावट करण्यात येणार आहे.

मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी महेश वाणी, उपाध्यक्षपदी जगदीश कवडीवाले, सचिवपदी प्रशांत श्रावगी आणि खजिनदारपदी अजय गडे यांची निवड करण्यात आली.

सभासद म्हणून धनंजय सराफ, संतोष कवडीवाले, प्रा. पंकज गडे, आनंद कवडीवाले, सचिन बुरुजवाले, सागर वाणी, वैभव यावलकर, हर्षल गजऋषी, शुभम वाणी, वैभव गजऋषी, गणेश गजऋषी, गिरीश भार्गव, वासुदेव कवडीवाले, दिपेश गजऋषी, सिद्धेश श्रावगी, श्रीहरी वाणी, देवेश बुरुजवाले, सुरज श्रावगी, दिपक वाणी, सिध्देश वाणी, प्रतीक श्रावगी, जयेश गजऋषी, रामचंद्र कवडीवाले, अक्षय वाणी, यज्ञेश बुरुजवाले, अंगद यावलकर, रुपेश श्रावगी, हर्षल माळी, निषाद सराफ आणि सिध्देश कवडीवाले यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *