• यावल शहरासाठी ७ कोटींच्या निधीची मागणी
  • अल्पसंख्याक भागांच्या विकासासाठी निधीची मागणी
  • नगरसेवकांनी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
  • आमदार अमोल जावळेंच्या मार्गदर्शनाखाली भेट
  • सुनेत्राताई पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद
  • लवकर निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन

JALGAON | यावल शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी ७ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. यावेळी निधीच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.

आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे यांच्या सहकार्याने ही भेट घेण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कदीर खान, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उमेशदादा फेगडे, विद्यमान नगरसेवक हेमराज फेगडे उर्फ बाळू तसेच भाजपाच्या गटनेत्या नंदाताई महाजन यांचे चिरंजीव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, यावल शहरातील अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी लवकरच आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.

या निधीमुळे यावल शहरातील अल्पसंख्याकबहुल भागातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

प्रतिनिधी | NTV न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *