• जि.प. उर्दू शाळेत उपक्रम
  • विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
  • शाळा व्यवस्थापन समितीचा पुढाकार
  • शैक्षणिक साहित्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
  • पालक आणि ग्रामस्थांकडून स्वागत
  • भविष्यातही विविध उपक्रम राबवणार

All Posts

JALGAON | यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करून शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.

स्कूल कमिटीचे अध्यक्ष तडवी फिरोज अब्बास, उपाध्यक्ष आरिफ मुनोद्दीन पिंजारी, इन्चार्ज मुख्याध्यापक सय्यद वासिक रईस आणि उपशिक्षक सय्यद मो. हनिफ यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत आणि शालेय जीवनात त्यांचा उत्साह वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *