यावल तालुक्यातील मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १०० वी वार्षिक सभा चेअरमन भरत धनसिंग चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.

संस्थेचे सचिव सुनील सुरवाडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची माहिती सभासदांसमोर मांडली. सभेतील अजेंड्यावरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी चेअरमन भरत धनसिंग चौधरी यांनी शेतकऱ्यांनी पीककर्जाची मुदतीत परतफेड करून शासनाच्या पंजाबराव कृषी व्याज सवलत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

सभेत सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांपैकी भुनेश्वरी विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्हाईस चेअरमन वासुदेव पाटील, संचालक हुकूमचंद पाटील, हरीभाऊ धिवर, काशिनाथ पाटील, युवराज पाटील, विनोद पाटील, धर्मराज पाटील, रायसिंग भालेराव, कांतीलाल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *