यावल तालुक्यातील दहिगाव येथे ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम तडवी बांधवांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशाला सुख, शांती आणि स्वास्थ्य मिळावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सालाबादप्रमाणे दहिगावातील गौसिया नगरमधून सकाळी नऊ वाजता ईद मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान मिठाईचे वाटप करण्यात आले आणि देशासाठी सुख, शांती व स्वास्थ्य मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

या मिरवणुकीत माजी मुक्तार खान पठाण, सत्तार तडवी, मनोहर पटेल, अजगर अली, अकील शेख, मुजफ्फर खान, इमरान शेख, मौलाना अन्सार आलम, चिराकोदिन रजा, जमिल रजा, हनीफ खान, आमिर खान, रौपखा सरदार खा., सत्तार टेलर यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. मिठाई वाटपानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *