जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील जिल्हा परिषद गार्बर्डी मराठी शाळेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या आदेशानुसार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई करून परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्यात आला.

डोंगराळ भागातील शाळांच्या परिसरात झाडाझुडपे वाढल्याने साप आणि इतर सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा परिसराची नियमित स्वच्छता आवश्यक असल्याने ही सापसफाई आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमात मेहेरबान तडवी, सुगचंद पाटील यांच्यासह गावातील नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छता कार्यात हातभार लावला. नागरिकांच्या सहभागामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित झाला.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज असून, शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *