JALGAON | यावल तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी आता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून २५ लिटर क्षमतेचे आरओ मशीन बसवण्यात आले असून, सरपंच दीपक नागो पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासनाला दररोज पाण्याच्या जारवर खर्च करावा लागत होता. ही अडचण वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी यांनी लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

यानंतर सरपंच दीपक पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेत ग्रामपंचायत निधीतून २५ लिटर क्षमतेचे आरओ मशीन उपलब्ध करून दिले. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य केंद्राच्या दैनंदिन गरजांसाठीही ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर, विनोद खेवलकर, नरेंद्र मराठे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य फकृद्दीन कुरेशी, अकबर मेंबर, सलीम शेख, उमेश बडगुजर, मुकेश खेवलकर, फैसलखान फारूकखान, योगेश कुंभार यांच्यासह रिझवानखान व अयाजखान उपस्थित होते.

तसेच गावातील विविध क्षेत्रातील मित्रमंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी, डॉ. वर्षा पाटील, औषध निर्माण अधिकारी फारुकी, आरोग्य सहाय्यक राजू तडवी, आरोग्य सेविका रमा पवार, मनिषा कोळी, वृषाली पाटील, आरोग्य सेवक सल्लाउद्दीन शेख यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकळी ग्रामपंचायतीने विकासकामांसोबतच आरोग्य क्षेत्रातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देत उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून, “स्वच्छ पाणी, निरोगी आरोग्य” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारा हा उपक्रम ठरत आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल


#Yawal #Sakali #NTVNewsMarathi #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #HealthNews #GramPanchayat #ROWater #Sakalinews #YawalNews #MaharashtraBreaking #LatestNews #MarathiBreakingNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *