यवतमाळ : २४ डिसेंबर हा ग्राहक दिन, येथील तालुका ग्राहक पंचायत व तहसील कार्यालया कडून ‘ग्राहक दिन’ साजरा करण्यात आला. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, ग्राहकांनी व्यवहार करतांना जागृत राहून व्यवहार करावा, फसवणूक होत असेल तर तक्रार दाखल करा असे मत ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा.मतीन खान यांनी व्यक्त करित ग्राहक कायदा विषयी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

ग्राहक दिनाचा कार्यक्रम येथील बुटले महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुधाकर राठोड, प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष प्राचार्य विनोद खडतकर, पुरवठा निरीक्षक पंकज सदातपूरे, ग्राहक पंचायतीचे सचिव, पत्रकार रामदास पद्मावार, सदस्य पत्रकार अभय इंगळे हे उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचलन प्रा.डाॅ.अजय जाधव यानी केले तर आभार तहसील कार्यालयाचे रशीद शेख यांनी मानले.या वेळी भुमीअभिलेख विभागाच्या संध्या राठोड, बुटले महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी तथा ग्राहक पंचायतचे सदस्य उपस्थित होते.

११० विद्यार्थ्यात निबंध स्पर्धा 

           ग्राहकांचे हक्क, फसव्या जाहीराती व ग्राहक दिनाचे महत्व या विषयावर बुटले महाविद्यालयाने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते यात ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ग्राहक जागृतीत आपले योगदान दिले. या स्पर्धेत अभिजीत राठोड हा प्रथम, सौरभ राठोड हा द्वितीय, हर्शिल तुपोने हा तृतीय तर धम्मपाल धंदे व अक्षदा पवार यांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले असून इतर सर्व स्पर्धकांना ग्राहक पंचायत तालुका दिग्रस कडून प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *