यवतमाळ : यवतमाळ येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित क्रीडा संमेलनाच्या मैदानी स्पर्धेचा पहिला दिवस गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल CBSE दिग्रस च्या चैतन्य इंगळे याने गाजविला,या स्पर्धेत ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल CBSE दिग्रस चे विद्यार्थी क्रीडा प्रशिक्षक आसिफ काजी यांच्यासह उपस्थित झाले.

या स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे यात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल CBSE दिग्रस च्या चैतन्य प्रवीण इंगळे याने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तसेच शंभर मीटर रिले रेस मध्ये आर्यन रमेशराठोड, करण अनिल पवार,सोनू भागवत गवळी,चैतन्य प्रवीण इंगळे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल CBSE दिग्रस यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.आझादी का सुवर्ण महोत्सव निमित्त जिल्हा क्रीडा भारती आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.उद्घाटन आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स कोच सुवर्ण सिंग आंतरराष्ट्रीय तिहेरी उडी पटू निहारिका वशिष्ठ यांच्या हस्ते झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे अध्यक्ष डॉ.विवेक वि.भास्करवार व मुख्याध्यापिका शेख अबेदा बेगम, उपमुख्याध्यापक शेख शरीफ, पर्यवेक्षक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *