यावल शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक ते बुरुज चौक या मार्गावर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असून, पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावल शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग आणि बेशिस्त वाहतुकीमुळे पादचारी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

विशेषतः बसस्थानक ते बुरुज चौक या मार्गावर वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियम मोडणाऱ्यांवर नियमित कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करणे, नियमित वाहतूक पोलीस नियुक्त करणे, दंडात्मक कारवाई आणि गर्दीच्या वेळेत विशेष वाहतूक नियंत्रण मोहीम राबवण्याची मागणी होत आहे.

अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करत यावल पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *